गुहागर :प्रसन्ना जागकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

banner 468x60

गुहागर तालुक्यातील कोंडकारूळचे सुपुत्र प्रसन्ना अनिल जागकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.

banner 728x90

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघर्षातून त्यांनी हे यश मिळवले आहे.प्रसन्ना जागकर यांचे प्राथमिक शिक्षण श्रीदेव गोपाळकृष्ण विद्यामंदिर गुहागर याठिकाणी तर माध्यमिक शिक्षण रखमाबाई पांडुरंग पालशेतकर हायस्कूल येथे झाले.

त्यानंतर त्यांनी डिएडचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यातून त्यांची जिल्हापरिषद शिक्षक म्हणुन सुद्धा निवड झाली होती. मात्र त्याच वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्यांची २०२१ मध्ये पोलीस आयुक्तालाय मुबंई याठिकाणी मंत्रालय लिपिक म्हणुन निवड झाली.

त्यामुळे त्यांनी मंत्रालय लिपिक हे पद स्वीकारले. आणी या पदावर कार्यरत असतानाच २०२४ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.

प्रसन्ना यांचा हा प्रवास सोपा नव्हता.अनेकवेळा यशाने काही गुणांनी हुलकावणी दिली… त्यामुळे त्यांना काही काळ डिप्रेशन चा देखील सामना करावा लागला. मात्र त्यांनी न डगमगता खचून न जाता गावापासून कुटुंबापासून लांब राहुन जिद्दीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. या परीक्षेची काठीन्य पातळी बघता निवड होण्यासाठी प्रचंड अभ्यासोबत वेळ ही लागतो. अश्यावेळीस गावी आलयावर नातेवाईक विचारायचे तू काय करतोस अजून नोकरीं मिळाली नाही का. कधी होणार तुझं काम, त्यामुळे प्रसन्नाने गावी जायच बंद केल आणी शहरात राहून जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून यश खेचून आणले. प्रसन्नाच्या या यशाचे श्रेय त्याने त्याच्या आईवडिलांना आणी कुटुंबियांना दिले.

प्रसन्नाचे वडील आणी भाऊ यांनी प्रसन्नाला खंबीर पाठिंबा दिल्यामुळे तो हे यश मिळवू शकला. त्याने सांगितले कि त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर केलेल्या संस्कारामुळे एवढा संयम ठेवून त्याने अभ्यास केला. त्याच्या भावाने कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत असताना प्रसन्नाला अभ्यासाठी प्रोत्साहन दिल्याचेही प्रसन्नाने सांगितले.खारवी समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असलेला दिसून येतो. त्यामुळे प्रसन्नाला समाजातील मुलांसमोर आदर्श ठेवायचा होता कि शिक्षणामुळे प्रगती होते.त्या आपल्या समाजातील लोकांमध्ये शिक्षणाबाबत जागृती निर्माण करायची होती. नव्या पिढीसाठी आदर्श बनायचं होत. आणि आज स्वतः संघर्ष करून प्रसन्ना या मुलांसाठी रोल मॉडेल बनला आहे.प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता अडचणींना न घाबरता त्याने संघर्ष करून हे यश मिळवले आहे यासाठी त्याचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *