संगमेश्वर : तालुक्यात 15 वर्षीय मुलगी बेपत्ता, धामापूर येथील मानसी भायजेचा शोध सुरू

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे रामणवाडी येथील मानसी मंगेश भायजे (वय १५ वर्षे) ही अल्पवयीन मुलगी मागील काही दिवसांपासून बेपत्ता झाली आहे.

दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजल्यापासून ती घरातून बाहेर पडली असून, त्यानंतर परत आलेली नाही.


कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र तीचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. यानंतर माखजन पोलिसांत बेपत्ता मुलीची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू असून, परिसरातील नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

मुलीचे नाव : मानसी मंगेश भायजे
वय : १५ वर्षे
पत्ता : मु.पो. धामापूर तर्फे संगमेश्वर रामणवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

📞 जर सदर मुलगी कोणाला आढळल्यास किंवा तिच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास तातडीने खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
•माखजन पोलीस स्टेशन : ९६७३५२९९१०
•सुरेश रामाने : ९८२२४०१२६०
•भाई मोरे (पोलीस पाटील) : ९६०४८०२८८२
•सागर गिजये : ८७७९२४६०१९

नागरिकांच्या सहकार्यामुळे मानसीचा शोध लवकर लागेल, अशी आशा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *