Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : प्रेमात झाला वेडा, प्रेयसी 5 दिवस बोलली नाही म्हणून तरुणाने केले विष प्राशन

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथील २१ वर्षीय तरुणाने विष प्राशन केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोहम राजाराम पवार असे विष प्राशन केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, सोहमची प्रेयसी गेल्या चार-पाच दिवसांपासून त्याच्याशी बोलत नव्हती. याच रागातून सोहमने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
विष प्राशन केल्यानंतर सोहमला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला प्रथम देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

तेथे उपचारादरम्यान त्याने विष प्राशन केल्याची बाब उघड झाली. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *