चाफवली ता. संगमेश्वर येथे जंगलतोडीवर काम करणारी महिला पेट्रोलने चूल पेटवत असताना ७० टक्के भाजली. गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. द्रौपदी चंद्रकांत पवार (वय ४२, रा. चाफवली, ता. संगमेश्वर) असे ७० टक्के भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना २८ डिसेंबरला दुपारी तीन च्या सुमारास चाफवली येथील जंगलमय भागात झोपडीत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार द्रौपदी हि चाफवली येथील जंगलमय भागात झोपडीत रहात असून रविवारी (ता.२८) दुपारी पेट्रोलने चूल पेटवत असताना आगीचा भडका उडाला व तिच्या कपड्यांनी पेट घेतला.
या आगीचा भडका एवढा भयंकर होता की, त्यामध्ये ती ७० टक्के भाजली. तात्काळ उपचारासाठी साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















