Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : मुसळधार पावसामुळे तीन दुकाने सोनवी नदीमध्ये कोसळली

banner 468x60

संगमेश्वर-देवरुख मार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाजवळील दुकानांचा नदीकाठचा भाग मुसळधार पावसामुळे खचल्याने तीन दुकाने कोसळली. या दुर्घटनेत सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेत बाबासाहेब प्रभावळे यांच्या ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट्स दुकानाचे अंदाजे १ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अजय निवळकर यांच्या टीव्ही रिपेरिंग दुकानासह दिलीप हरी जोशी यांच्या फोटो स्टुडिओलाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे.

banner 728x90 banner 728x90

दरम्यान, या भागातील इतर दुकानेही धोकादायक अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *