Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : कळंबस्ते मोहल्ल्यातील येथील 17 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ला येथील १७ वर्षीय अय्याज नेवरेकर या तरुण युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. त्याने अचानक असे का? पाऊल उचलले हा अनुत्तरित प्रश्न अनेकांना सतावत असून त्याच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करणेत येत आहे.

banner 728x90 banner 728x90

संगमेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार बुधवार ता. २६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अर्श अय्याज नेवरेकर यांनी आपल्या राहत्या घरातील एका खोली मधील सिलिंग पंख्याला ओढणीने स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतल्याचे शेजारील अरबाज मुरतूझा नेवरेकर यांना दिसून आले.

अरबाज नेवरेकर यांनी त्यांच्या शेजारील नासीर उस्मान दसूरकर यांना अर्श याने गळफास लावल्याचे दिसून आले याची माहिती दिली असता नासीर दसुरकर यांनी खात्री करण्याच्या उद्देशाने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता अर्श हा पंख्याला लटकताना त्यांना दिसून आला,

मात्र तो जीवित असेल असा त्यांचा समज झाल्याने नाशीर दसूरकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला खाली उतरवले आणि तात्काळ स्थानिक डॉक्टर श्री, नगारजी यांना बोलावण्यात आले.डॉ. नगारजी यांनी अर्श ची तपासणी केली असता तो मृत झाल्याचे दिसून आले.या घटनेची खबर श्री नासीर दसुरकर यांनी संगमेश्वर पोलिसांना दिली असता संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, आणि उत्तरीय तपासणीसाठी अर्श याचे शव संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली असुन अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप अधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस ऊप निरीक्षक श्री,चंद्रकांत टी,. कांबळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *