देवरूखजवळील साडवली सप्तलिंगीनगर येथील भरवस्तीतील पाच बंद घरे फोडल्याची घटना उघडकीस आली असून, या चोरीचे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, शनिवारी आणि सोमवारी दोन टप्प्यांत ही घरे फोडल्याचे समोर आले आहे.
देवरूख–संगमेश्वर मुख्य मार्गालगत असलेल्या साडवली सप्तलिंगीनगर येथील बंद घरे मुख्य रस्त्यापासून अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरावर आहेत.
आनंद बोंद्रे, विश्वनाथ जवरत आणि सुजित जाधव ही तिन्ही कुटुंबे दिवाळी सुट्टीसाठी बाहेर गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.
चोरट्यांनी बोंद्रे व जवरत यांच्या घराचे कुलूप तोडले; मात्र आत काहीही मिळाले नाही. सुजित जाधव यांच्या दुचाकीची नंबर प्लेट काढण्यात आली, तसेच त्यांच्या भाडेकरूच्या घराचेही कुलूप तोडण्यात आले.
तसेच रमेश गोताड यांची दुचाकी (एमएच ०८ एझेड ३०८०) चोरट्यांनी लंपास केली. जवरत यांच्या घरासमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे तीन चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत.
या घटनेनंतर देवरूख पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, शनिवारी तीन आणि सोमवारी दोन अशी एकूण पाच बंद घरे फोडल्याच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















