Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : डॉ. अर्शिन धामस्कर हिचे दंतवैद्य (BDS) परिक्षेत उज्वल यश

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील फणसट गावाने एका गुणवान कन्येच्या यशाने आपला मान उंचावला आहे. फणसट गावची सुकन्या अर्शिन अस्लम धामस्कर हिने दंतवैद्य (BDS) पदवी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

banner 728x90 banner 728x90

दमण येथील वैदिक डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, दमण येथून तिने ही प्रतिष्ठित पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. अर्शिन धामस्कर हिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देवरुखमध्ये झाले.

तिने दहावीपर्यंतचे शिक्षण देवरुखच्या अरुंधती पाध्ये इंग्लिश मीडियम स्कुलमधून पूर्ण केले. त्यानंतर बारावी (विज्ञान शाखा) पर्यंतचे शिक्षण तिने कै. मिनाताई ठाकरे विद्यालयातून यशस्वीरित्या पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या अर्शिनने मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निश्चित केले आहे.
कठीण BDS अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून डॉ. अर्शिनने आता दंतवैद्य म्हणून पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि तालुक्यातील अनेक युवा पिढीसाठी ती एक प्रेरणास्रोत ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *