Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : धक्कादायक – घरात एकटी, अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार

banner 468x60

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सुरु असतानाच खेडेगावात सुद्धा ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या व हादरवणाऱ्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. संगमेश्वर तालुकातील कळंबूशी या खेडेगावात काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे. घरात अल्पवयीन मुलगी एकटीच असल्याच्या संधीचा फायदा घेत नराधमाने तिचे जोरात तोंड दाबून तसेच तीचे दोन्ही हात पकडून जीवे ठार मारण्याची धमकी देत जोरजबरदस्तीने अत्याचार केला.

banner 728x90 banner 728x90

ही घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेबाबत, बाहेर याची वाच्यता केलीस तर तुला ठार मारून टाकेन अशी धमकी नराधमानं पीडित अल्पवयीन मुलीला दिल्याने ती घाबरून गेली होती. त्यामुळे काही दिवसानंतर याची तक्रार संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, त्या नराधमाच्या संगमेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

घडलेल्या घटनेची अधिक हकीकत अशी की, संगमेश्वर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येणाऱ्या कळंबुशी गावातील योगेश यशवंत पवार (वय वर्ष 28) याने अल्पवयीन मुलगी एकटीच असून त्या घरात अन्य कोणीच सदस्य नाहीत असे समजताच त्याची नियत बदलली. त्याने याच संधीचा फायदा घेत त्या मुलीच्या घरात जाऊन तहान लागली आहे असे सांगून पिण्यास पाणी मागितले.

पाणी मागणाऱ्या त्या नराधमाच्या मनात तिच्या बाबतीत वाईट हेतू आहे, हे त्या बिचाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला कसे समजणार, त्यातही तो गावातीलच होता. ती अल्पवयीन मुलगी पाणी आणण्यासाठी म्हणुन घरात शिरताच त्या विवाहित नराधमाने घराचा दरवाजा बंद करून आतून कडी लावून घेतली.

काहीतरी अघटीत घडणार याची जाणीव झाल्याने ती अल्पवयीन मुलगी भयभीत झाली. मात्र ती आरडाओरड करण्यापूर्वी तीचे तोंड जोरात दाबून व दोन्ही हात पकडून, ओरडलीस तर तुला ठार मारून टाकेन अशी धमकी देत त्या नराधमाने अल्पवयीन मुलीबरोबर घाणेरडे कृत्य केले. तिच्यावर जोरजबरदस्ती करताना ती प्रतिकार करत असताना त्याला झुगारुन तिच्यावर अत्याचार केले.

एवढेच नव्हे तर या घटनेची वाच्यता कोठे घरात वा बाहेर केलीस तर तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी सुद्धा त्या नराधमाने पीडित मुलीला दिली.नराधमाच्या धमकीला घाबरून पीडितीने घडलेल्या घटनेची वाच्यता काही दिवस कोठेच केली नाही. तर काही दिवसांनी त्या नराधमाच्या पत्नीला तिच्या पतीने केलेल्या घटनेचा प्रकार सांगितला. मात्र पत्नीने थेट पीडित मुलगी आणि तिच्या आईवर शिव्यांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली,

तर एवढ्यावरच न थांबता तिने पीडित मुलगी आणि तिच्या आईला मारहाणही केली. अखेर त्या पीडित मुलीने संगमेश्वर पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकारची तक्रार 21 मे रोजी दाखल केली. संगमेश्वर पोलिसांनी तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करून त्या नराधमाच्या अवघ्या काही

तासात मुसक्या आवळल्या असून भारतीय न्याय सहिंता कलम 64(2),(आय ), 351(3)115(2)352, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधियम 212 चे कलम 421, प्रमाणे बलात्कार पोक्सो लावण्यात आले असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शंकर नागरगोजे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *