संगमेश्वर : 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

banner 468x60

संगमेश्वरयेथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज रवींद्र गुरव (वय २२, रा. सरंद-गुरववाडी-संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास निदर्शनास आली. तरुणाने आत्महत्या नेमकी का केली याचं कारण समोर आलं नाही.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज गुरव याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून घरातील भालाला नायलॉनची ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. खबरीवरुन पोलिसांनी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *