रत्नागिरी शहराच्या गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तीन विक्री करणाऱ्यांना रत्नागिरी शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ३ ग्रॅम ‘ब्राऊन हेरॉईन’ सदृश्य अंमली पदार्थ आणि एक दुचाकी, असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत ही मोठी कारवाई केली आहे.
गुरुवारी, २ जानेवारी रोजी सायंकाळी ७:४० च्या सुमारास आठवडा बाजार येथील गाडी पार्किंगमध्ये काही इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे उग्र वासाचा ३ ग्रॅम ‘ब्राऊन हेरॉईन’ सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला.
पोलिसांनी याप्रकरणी अजय उर्फ पप्पू प्रभाकर नाचणकर (वय ४६, रा. तेली आळी, रत्नागिरी), मुनाफ नुस्द्दीन वस्ता (वय ३७, रा. राजीवडा, काद्री मस्जिद जवळ, रत्नागिरी), अरसलान सिकंदर फणसोपकर (वय २५, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी १८,८०० रुपये किमतीचे ३ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, ७५,००० रुपये किमतीची निळ्या रंगाची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी (क्र. एम.एच. ०८.ए.व्ही. १८२३) असा एकूण ९३,८०० रुपयांच माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमित राघू पालवे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८(क), २१ (अ) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ जानेवारी रोजी पहाटे १:२८ वाजता या तिन्ही आरोपींना अधिकृतपणे अटक करण्यात आली. शहरातील अमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधिक तपास करत असून, या तस्करांचे धागेदोरे कोणाशी जोडलेले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*