रत्नागिरी : ‘तुला माहीत आहे कलेक्टर माझा माणूस, तू इथून जिवंत कसा जातोस ते मी पाहतो’ रवींद्र दामलेनी जिल्हाधिकाऱ्यांचे नाव वापरून दिली धमकी

banner 468x60

ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून फिर्यादीच्या चारचाकी वाहनाचा रस्ता अडवून जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर करत धमकी दिल्याचा प्रकार रविवारी सकाळी शिरगाव (ता. रत्नागिरी) येथे घडला.

याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वैजनाथ दामले (रा. शिरगाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्यांच्या विरोधात पुष्कर माधव दामले (वय ५७, मूळ रा. शिरगाव, रत्नागिरी, सध्या रा. डोंबिवली पूर्व, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार रविवारी सकाळी रवींद्र दामले यांनी पुष्कर दामले यांना पाहून ‘ग्रामपंचायतीने काढलेले गेट मी परत लावले. तुला माहीत आहे कलेक्टर माझा माणूस असून, तू इथून जिवंत कसा जातोस ते मी पाहतो,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच त्यांच्या कुटुंबाच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे लोखंडी गेट व गडगा बांधला. त्याचप्रमाणे शिरगाव ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून चारचाकी वाहनाचा रस्ता अडवून सरकारी मोजणीच्या खाणाखुणा नष्ट केल्या. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२६ (२), २३८, ३२९ (३), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *