रत्नागिरी : तब्बल १७ तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत

banner 468x60

रत्नागिरी:- निवळी येथे रविवारी सकाळी ८ वाजता बस आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे १७ तास ठप्प होती.

टँकरमधून गॅस गळती होत असल्याने खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती.महामार्ग पोलिसांनी वाहतूक उक्षीमार्गे वळवली होती,

मात्र त्यामुळे उक्षी घाटातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांचीही दमछाक झाली होती.

अखेर, पोलिस प्रशासन, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस,ग्रामस्थ तसेच सर्व संबंधित प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास निवळी घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *