रत्नागिरी : शाहरुख शेख महाराष्ट्र तायक्वांदो संघाच्या प्रशिक्षकपदी

banner 468x60

राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या शाहरुख शेख यांची महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्हा असोसिएशन आयोजित 17 ते 20 ऑगस्ट

रोजी होणाऱ्या 41 व्या जुनियर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ही निवड करण्यात आली आहे.विभागीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स संभाजीनगर या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण देशातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

याच स्पर्धेसाठी रत्नागिरीतील शहरुख निसार शेख यांची महाराष्ट्र संघात प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीतील एस आर के तायक्वांदो क्लब रत्नागिरीचे ते प्रमुख प्रशिक्षक आणि अध्यक्ष तसेच राष्ट्रीय पंच असून आज पर्यंत त्यांनी अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे, सचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे , धुलीचंद मेश्राम, खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्लब उपाध्यक्ष अमोल सावंत, कोषाध्यक्ष अंजली सावंत, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वांदो ऑफ महाराष्ट्र, एस आर के तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *