रत्नागिरी : शादाब बलबलेला दुसऱ्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन

banner 468x60

रत्नागिरी गोवंश हत्त्या प्रकरणातील आरोपी शादाब बलबलेला बेकायदेशीररित्या गुरे बाळगल्याप्रकरणी गुन्ह्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

गोवंशाची कापलेली मुंडी मिळाल्याप्रकरणी पहिल्या गुन्ह्यात त्याला अटक झाली . परंतु तो जामीनावर मुक्त झाला होता . ग्रामीण पोलिस त्याला बेकायदेशीररित्या वेतोशी येथे गुरे बाळगल्याप्रकरणात अटक करण्याच्या प्रयत्नात होते .

रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील रेल्वे कॉलनीजवळच्या रस्त्यावर गोवंशची कापलेली मुंडी मिळाली होती . याप्रकरणी शादाब बलबले ( वय ३० , रा . क्रांतीनगर ) याला अटक करण्यात आली होती .

वेतोशी येथे त्याने प्राणी संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करून गुरे बाळगली असल्याचे पोलिसांना आढळून आल्याने त्याच्यावर याप्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाला होता . या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा , यासाठी न्यायालयात धाव घेतली होती . शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला २५ हजार रुपये जातमुचलक्याचा जामीन मंजूर केला .

रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात हजेरी लावण्याची अटही न्यायालयाने घातली आहे . गोवंशची मान मिळाल्यानंतर आरोपीला अटक व्हावी , यासाठी हिंदू बांधवांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते . याचा परिणाम म्हणून शादाब बलबले या आरोपीला अटक करण्यात आली . पोलिस कोठडीत पोलिसांनी केलेल्या तपासात सहकार्य केले नाही .

त्याचबरोबर हा गुन्हा गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याला जामीन न देता न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली होती . यासंदर्भात पोलिसांकडून लेखी म्हणणे सादर न झाल्याने न्यायालयाने जामीन मंजूर केला . हा जामीन रद्द व्हावा , यासाठी जिल्हा न्यायालयात अपील करण्याबाबतची पोलिसांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *