मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलचे डोके कापून बोट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना देवगड समुद्रात सोमवारी घडली आहे.
या घटनेने खळबळ उडाली आहे. कोस्टगार्डच्या मदतीने बाकीच्या खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. सिंधुदुर्गातील देवगडच्या समुद्रात रत्नागिरीतील खलाशाचा खून केल्याची घटना सोमवार 28 रोजी दुपारी घडली.
झारखंड येथील निर्दयी खालाशाने रत्नागिरी गुहागर येथील खालाचे मुंडके कापले त्यानंतर त्याने रागाच्या भरात बोटीलाच आग लावून दिल्याने भर समुद्रात बोटीचा थरार अंगावर काटा आणणारा होता.
या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रवींद्र नाटेकर ( गुहागर) असे ठार झालेल्या या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवगड येथील समुद्रात रत्नागिरी व आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर बोटी मच्छीमारीसाठी गेलेल्या होत्या.
त्यामध्ये रत्नागिरी राजीवडा येथील रफिक फणसोपकर यांची बोट मच्छीमारीसाठी देवगड बंदरात गेलेली होती. मच्छीमारी करत असतानाच मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलाचे डोके कापले आणि ते डोकं बोटीवर ठेवून दिले.
त्यानंतर संपूर्ण बोटीला आग लावली. या आगीमध्ये बोट मालकाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. यावेळी आजूबाजुला असलेल्या रत्नागिरीतील काही मच्छीमार बोटीवरील लोकांनी जळणा-या बोटीवरच्या तीस ते पस्तीस लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यानंतर कोस्टगार्डला पाचारण करण्यात येऊन बोटीवरच्या इतर खलाशांचे प्राण वाचविण्यात आले. या घटनेतील मृत तांडेल हा जयगड येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. रफिक फणसोपकर यांच्या मालकीची बोट देवगड येथील समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. यावेळी झारखंड येथील खलाशासोबत रत्नागिरी गुहागरातील रवींद्र नाटेकर याच्याशी बाचाबाची झाली.
या बाचाबाचीचे हाणामारीत रूपांतर झाले. झारखंड येथील खलाशाने रागाच्या भरात रवींद्र याचे मुंडकेच सूऱ्याने उडवले. एवढेच नव्हे तर या नराधमाने ते मुंडके उचलून बोटीवर पुढे आणून ठेवले.
एवढं कमी काय म्हणून त्याने रागाच्या भरात स्वतः च उभ्या असलेल्या बोटीला आग लावली. या घटनेमुळे रत्नागिरीतील मच्छिमार व्यवसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*