रत्नागिरी : रत्नागिरीत का झाला राडा पाहा दोन्ही बाजू, RSS चा कार्यक्रम उर्दू शाळेत का ? चुकी कोणाची कोणी दिल्या घोषणा, RSSच्या रॅलीचा मार्ग का बदलला ? नेमकं प्रकरण काय पाहा

banner 468x60

हिंदू मुस्लिम ऐक्याचे दाखले देणाऱ्या कोकणाला झालंय काय असा प्रश्न पडतो कोकणातील हिंदू मुस्लिम प्रेमाचे राज्यभर उदाहरणे देत असताना रत्नागिरीमध्ये दोन धर्मात तेढ निर्माण करणारी घटना घडली .

दसऱ्याच्या पूर्वसंद्येला म्हणजे शुक्रवारी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पथ संचालन सुरु असताना अल्लहू अकबर च्या घोषणा दिल्याने रत्नागिरी शहरातील हिंदू नागरिक आक्रमक झाले. मात्र यासर्व प्रकाराला आता वेगळं वळण लागलं आहे.

या सगळ्या प्रकाराबाबत दोन बाजू समोर आल्या आहेत. दरवर्षी आरएसएस संघटनेकडून पथ संचलन कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. परंतु या संचलनाची रॅलीचां मार्ग मारुती मंदिर ते टिळक आळी असा असल्याचे शहरातील काही सजग नागरिक सांगतात.

मात्र पूर्वीचा संचलनाचा मार्ग बदलून यंदा दसऱ्यानिमित्त कोकणनगर नजिक कदमवाडी येथे पथ संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी यांनी परवानगी देऊन तशी माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती.

त्यामुळे यावर्षी मार्ग का बदलला असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे.
संचलनाचे आयोजित ठिकाण हे बाजूलाच राहिले, एक एक स्वयंसेवक उर्दू शाळेच्या परिसरात जमा होण्यास सुरुवात झाली. परंतु आयोजित ठिकाणी ( कदमवाडी) कार्यक्रम न घेता थेट संचलनाचा कार्यक्रम उर्दू शाळेत घेण्यात आला.

हा प्रकार पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक शाळेजवळ दाखल झाले. या कार्यक्रमाबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनाही पुसटशी कल्पना नसल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाने परवानगी दिलेले कदमवाडी हे ठिकाण शाळेपासून दूर आहे.

तसेच उर्दू शाळा ही कोकणनगरच्या एका अंतर्गत रस्त्याला आहे. संघाच्या संचलनचा कार्यक्रम उर्दू शाळेत होत असल्याचे पाहून तेथील नागरिकांमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चाळीस वर्षात असा कोणताही कार्यक्रम या उर्दू शाळेत झालेला नाही, कार्यक्रमाला परवानगी दिली कोणी असा खडा सवाल दाखल झालेल्या नागरिकांनी पोलिसांसमोर उपस्थित केला. परंतु पोलिसांनी गांभीर्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखत सुरू असलेल्या संचलनाच्या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात केला. शाळेतुन संचलन सुरू झालेल्या प्रकाराने आधीच संतप्त झालेल्या मुस्लिम बांधवांनी रॅली अर्धी निघून गेल्यानंतर नारा – ए – तकबीर, ‘अल्लाहु अकबर’ अशा घोषणा दिल्या.

जमावाला शांत राहण्याचे पोलिसांनी आवाहन केल्यानंतर संतप्त झालेला जमाव शांतही झाला. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास चर्मालय मार्गाच्या दिशेने निघाले, त्यांच्या पाठोपाठ तत्काळ पोलिसांनी देखील धाव घेतली. चर्मालय परिसरात जमाव आल्यानंतर दोन तरुण त्याठिकाणी आले.

त्याठिकाणी बाचाबाची झाल्याने त्या दोन तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर एक तरुण पळून गेला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्या तरुणाला देखील ताब्यात घेतले होते.


दरम्यान अचानक कोकणनगर पोलिस चौकी शेजारील मोहल्ल्यात जय श्रीरामच्या घोषणा सुरु झाल्या. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांची धावपळ सुरु झाली. जमाव अधिकच आक्रमक झाला होता. दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

कोकणनगर येथे मध्यरात्री बिघडू लागल्याने पोलिसांनी सुरुवातीला जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी अखेर जमावाला पांगवण्यासाठी लाठ्यांचा प्रसाद देण्यास सुरुवात केली.

कोकणनगरमध्ये दाखल झालेला जमावातील कार्यकर्ते सैरावैरा इकडे-तिकडे पळत सुटले. पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आणि कोकणनगर पोलिस चौकीत बसवून ठेवले. यावेळी आलेल्या जमावाने कोंकणनगर येथील काही घरांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.

मात्र रत्नागिरी पोलिसांनी बाजी लावून आपल्या कौशल्याने ही सर्व परिस्थिती हाताळली. दुसऱ्या दिवशी हे सर्व प्रकरण नागरीकांना समजताच चौकाचौकात चर्चा रंगू लागल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात शहर पोलिस स्थानकात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी माजी नगरसेवक मुसा काझी व इतर १० ते ११ जणांवर भारतीय न्यायसंहिता २३ चे कलम १९० (१), १९० (२), १९१  (१), १९२, १९५, १९६, ५७ महाराष्ट्र पोलिस कायदा अधिनियम ३७/१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद वरुण शामसुंदर पंडीत यांनी शहर पोलिस स्थानकात दिली आहे.

तर दुसरा गुन्हा पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश कृष्णा पवार यांच्या तक्रारीवरुन दाखल झाला आहे. कोकण नगर चौकीबाहेर मोहल्ल्यात जय श्रीरामच्या घोषणा देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवली आणि दोन तरुणांना मारहाण केली.

याप्रकरणी पोलिसांनी सागर प्रकाश कदम, यश नितीन सुर्वे, शुभम संजय साळवी यांच्यासह इतर ३० ते ४० जणांविरुध्द भारतीय न्याय संहिता १८९ (२), १९०, १९१ (२), १९६, ११८, ५७ महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७/१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *