रत्नागिरी : पुन्हा सापडली ब्राऊन शुगर

banner 468x60

ब्राऊन शुगरची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाेलिसाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून

banner 728x90

३३,६०० रुपयांचे ४ ग्रॅम ब्राऊन हेरॅाईन जप्त करण्यात आले असून, ही कारवाई रविवारी दुपारी निवखोल रोड येथील एका हायस्कूलच्या मागे करण्यात आली.

इबादुल्ला मुजीब पावसकर (वय २६, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी १२:२५ वाजण्याच्या दरम्यान निवखोल रोड येथील हायस्कूलच्या पाठीमागे इबादुल्ला पावसकर हा ब्राऊन हेरॅाईन घेऊन उभा होता.

याबाबतची माहिती पोलिस हवालदार झोरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एका प्लास्टिक पिशवीत ब्राऊन हेरॅाईन हा अमली पदार्थ सापडला. त्याचे वजन ४ ग्रॅम असून, त्याची किंमत ३३,६०० इतकी आहे. हा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *