रत्नागिरी : पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांची 24 तास गस्त

banner 468x60

मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन घाटीत अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटक मिनी स्वीत्झर्लंडमधून बाहेर येताच २० फूट अंतरावरून गोळीबार सुरू झाला; या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला.

banner 728x90

या हल्ल्यानंतर आता देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोकण किनारपट्टीवरही अलर्ट देण्यात आला आहे. पोलिसांनी किनारी भागामध्ये गस्त वाढवली आहे.
कोकण किनारपट्टी भागात चेकपोस्ट तसेच संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी गस्त वाढवली असून चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाची चौकशी करुन तपासणी केली जात आहे.


पोलिसांनी नवीन चेकपोस्ट उभे केले आहेत. पोलिसांनी २४ तास गस्त सुरू ठेवली आहे. कोकण किनारपट्टीवरील लॅडिंग पॉइन्ट आहेत त्या ठिकाणी २४ तास गस्त असणार आहे. संशयित गाड्यांची पोलिस तपासणी करत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी गस्त वाढवली आहे.


मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आज बुधवारी उत्तर काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. आज उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते, पण लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. सध्या दहशतवादी आणि लष्करांमध्ये चकमक सुरू आहे.


भारतीय सैन्याने सांगितले की, बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. आज २३ एप्रिल २०२५ रोजी, सुमारे २-३ UAH दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील उरी नाल्यातील सरजीवनच्या सामान्य भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असल्याची माहिती समोर आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *