रत्नागिरी : दारूच्या पैशासाठी महिलेच्या डोक्यात लादीचा तुकडा मारून गंभीर दुखापत

banner 468x60

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका महिलेच्या डोक्यात लादीचा तुकडा मारून तिला दुखापत केल्याची घटना रत्नागिरी शहरातील झारणी रोड परिसरात घडली. तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर सुरेश गुरव (वय ४५, रा. झारणी रोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २१) दुपारी सुमारे तीनच्या सुमारास घडली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऐश्वर्या सागर गुरव (वय २१, रा. झारणी रोड, रत्नागिरी) यांच्याकडे सागर गुरव हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. मात्र पैसे नसल्याचे सांगितल्याने त्याने रागाच्या भरात घराच्या बाथरूमजवळ ठेवलेला लादीचा तुकडा उचलून त्यांच्या डोक्यात मारला, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली.


दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांनाही संशयिताने शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ऐश्वर्या गुरव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *