रत्नागिरी शहरातील मजगाव रोड वरील कोकणनगर येथे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भावना सतकुमार चौधरी (वय १६, रा. मजगावरोड, कोकणनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) दुपारी पावणे एकच्या सुमारास कोकणनगर येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरुणीने कोणत्यातरी अज्ञात कारणातून रहात्या घराच्या बाजूला असलेल्या बाथरुमच्या हुकाला नायलॉनची ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून दुपारी दोनच्या सुमारास मृत घोषित केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















