रत्नागिरी : कुडाळमधून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी रत्नागिरीत सापडली

banner 468x60

कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा कुडाळ पोलिसांनी तात्काळ शोध लावला आहे. मुलीला आणि संशयित आरोपीला रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतर काही वेळातच कुडाळ पोलिसांनी सूत्रे हलवून कामगिरी यशस्वी केली आहे.

banner 728x90

याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ पोलीस ठाणे हददीत एक अल्पवयीन मुलगी दिनांक ३.९.२०२४ रोजी कुडाळ बाजारात जाऊन येते असे सांगुन निघुन गेली ती परत आली नाही. त्याबाबत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती मिळून आलेली नसल्याने व सदरची मुलगी तिचे मित्रासोबत गेली असावी असा संशय व्यक्त केला.

त्याबाबत मुलीचे पालकांनी दिनांक ९.९.२०२४ रोजी कुडाळ पोलीस ठाणे येथे माहीती दिली. अपहरण झालेली मुलगी ही अल्पवयीन असल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी तात्काळ दखल घेवुन अपहरण झालेल्या मुलीबाबत संशयीत आरोपीताबाबत गोपनीयरित्या व तांत्रीक विश्लेषणाधारे माहीती काढली.

त्यानंतर आरोपी व अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी ही रत्नागिरी येथे असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानंतर कुडाळ पोलीसांनी रत्नागिरी पोलीसांना सदरबाबत माहीती देवुन आरोपीताच्या ठावठिकाणाबाबत माहीती दिली. त्यावरुन सदर आरोपीस अपहरण केलेल्या मुलीसह ताब्यात घेण्यात घेवुन सदर गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणलेला आहे.


सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे राजेंद्र मगदुम, पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे.

यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश कऱ्हाडकर, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संजय कदम, प्रितम कदम, रुपेश सारंग तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहूल जाधव, अमोल भोसले, रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार महेश गुरव व आशिष शेलार यांनी केली आहे.

संशयितांवर बीएसार कलम १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *