खेड ते रत्नागिरी असा प्रवास करताना बावनदी येथे कर्तव्य बजावणाऱ्या वाहकाला मारहाण करणाऱ्या संशयित प्रवाशाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत लक्ष्मण तांबे (वय २६, रा. वेळंब, ता. गुहागर) असे – संशयित प्रवाशाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २३) सकाळी खेड ते रत्नागिरीकडे येणाऱ्या बसमध्ये बावनदी बसस्टॉपच्या पुढे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखाराम परमेश्वर बांगर (वय ३४, रा. समर्थ नगर, भरणेनाका, ता. खेड) हे वाहक असून, चालक गुणेश गुलाब गाडेकर यांच्यासोबत एसटी घेऊन खेड-रत्नागिरी असे निघाले होते. वाहक सखाराम बांगर यांनी बावनदी पुलाजवळील बसस्टॉपवर प्रवासी उतरण्यासाठी बेल दिली व गाडीतील प्रवासी उतरले.
चार प्रवासी बसमध्ये चढले. त्यांचे तिकीट काढून त्यांना दिले. त्यातील एक प्रवासी संशयित संकेत तांबे याने बावनदी ते रत्नागिरी असे ४१ रुपयांचे तिकीट काढले. ५० रुपयांची नोट दिली. त्या वेळी फिर्यादी वाहक यांच्याकडे पैसे सुट्टे नव्हते. त्यांनी संशयित तांबे यांना तुम्ही मला एक रुपया द्या नाहीतर रत्नागिरीत उतरल्यावर मी तुम्हाला सुट्टे पैसे देतो, असे सांगितले. त्याचा राग येऊन संशयित संकेत तांबे याने तुम्ही खेडमधून आला आणि तुमच्याकडे पैसे नाही, असे बोलून रागाच्या भरात वाहकाच्या कानाखाली वाजवली.
तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी सखाराम बांगर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













