रत्नागिरी : जिल्ह्यातील 9 पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर

banner 468x60

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये दापोलीसाठी नागरिकांचा मागासवर्ग, राजापूरसाठी नागरिकांचा मागासवर्ग महिला, चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरीसाठी सर्वसाधारण, तर मंडणगड, संगमेश्वर, लांजा आणि खेडसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले.

दापोली: मागासवर्ग,
राजापूर: मागासवर्ग महिला,
चिपळूण-गुहागर-रत्नागिरी: सर्वसाधारण
मंडणगड-संगमेश्वर-लांजा-खेड: सर्वसाधारण महिला

या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तहसीलदार सर्वसाधारण मीनल दळवी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रारंभी माहिती दिली. त्यानंतर अनन्या यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *