रत्नागिरी : काम देण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक

banner 468x60

काम देण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक झाल्याची घटना रत्नागिरी येथे घडली आहे मी नामवंत कंपनीचा एक्झिक्युटिव्ह आहे.

आपल्यासाठी वर्क फ्रॉर्म होम कामाची (जॉब) संधी देत आहे, असे आमिष दाखवत रत्नागिरीत एका तरुणाची २ लाख १४ हजार ३१४ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आदींबाबत जनजागृतीसाठी ही रक्कम मागवून फसवणूक झाल्याचे शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरंजन सुशांत सावंत (रा. हिंदू कॉलनी, मारुती मंदिर, मूळ दापोली) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ईशाना पटेल, कार्तिका सुरेश, त्रिशा जैन (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत.

या तिघांनी निरंजनला फोनवर मेसेज करून ‘वर्क फ्रॉम होम’च्या कामाची संधी देतो, असे सांगितले. १८ ते २३ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला. याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. निरंजनला मोबाईलवर ईशाना पटेल याचा मेसेज आला.

एका कंपनीचा एक्झिक्युटिव्ह आपल्यासाठी वर्क फ्रॉर्म होम कामासाठी संधी देत आहे. या मुदतीत ईशाना पटेल, कार्तिका सुरेश, त्रिशा जैन यांनी ऑनलाईन पद्धतीने निरंजनला वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवले. सुरुवातीला काम करण्याचा मोबदला देऊन वारंवार व्हॉट्सअॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून निरंजनच्या संपर्कात राहिले.


त्यानंतर कंपनीची रेस्टॉरंट आणि हॉटेलची जनजागृती करण्याच्या नावाखाली निरंजनकडून २ लाख १४ हजारांची रक्कम उकळली. निरंजन, त्याची आई आणि मित्र यांच्या अकाउंटमधून ही रक्कम भरण्यास लावून त्याची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *