रत्नागिरी : जिल्ह्यात आढळले बिबट्याचे दुर्मिळ पांढरे पिल्लू

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. वनविभागाला येथे बिबट्याचे एक पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळून आले आहे. महाराष्ट्राच्या वन विभागाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचे पांढऱ्या रंगाचे बिबट्याचे पिल्लू सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालताना या अनोख्या पिल्लाला पाहिले. त्यानंतर तातडीने खबरदारी घेत त्याची आई आणि त्याच्यात पुनर्मिलन घडवून आणले. सध्या हे पिल्लू आपल्या आईसोबत असून वन विभाग त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

यासाठी परिसरात विशेष कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांच्या प्रत्येक हालचालीची नोंद घेतली जाईल. दरम्यान, हे पांढरे पिल्लू ‘ल्युकिस्टिक’ (Leucistic) आहे की ‘अल्बिनो’ (Albino) याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे या पिल्लाचे डोळे अद्याप पूर्णपणे उघडलेले नाहीत, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डोळे उघडल्यानंतर आणि पुढील वैद्यकीय तपासणीनंतरच त्याच्या रंगाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.
‘ल्युसिझम’ ही एक जनुकीय स्थिती आहे, ज्यामुळे प्राण्यांच्या त्वचेतील रंगद्रव्य कमी होते आणि ते फिकट किंवा पांढरे दिसतात, पण त्यांचे डोळ्यांचा रंग सामान्य असतो. तर,

‘अल्बिनिझम’मध्ये रंगद्रव्य पूर्णपणे नसते, ज्यामुळे त्वचा आणि डोळे दोन्ही पांढरे किंवा गुलाबी दिसू शकतात.
राज्यात पहिल्यांदाच पांढऱ्या बिबट्याचे पिल्लू आढळल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. वन विभाग या पिल्लाच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत असून त्याच्या वाढीवर सतत लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्मिळ पिल्लाच्या अधिक माहितीसाठी वन विभाग प्रयत्नशील आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *