रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
ही घटना भाऊबीजेच्या दिवशी रविवारी रात्रीच्या सुमारास घडल़ी. चिराग शरद खटकुळ (ऱा नाणीज, रत्नागिरी) व अक्षय सुरेंद्र शिंदे (ऱा सोमेश्वर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़. निखिल नारायण सावंत (ऱा नाणीज, रत्नागिरी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आह़े.
या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केल़ी. निखिल सावंत व संशयित आरोपी यांच्यात काही कारणावरुन वाद निर्माण झाला होत़ा.
3 नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी हे गाडी (एमएच 43 बीके 6210) घेवून निखिल यांच्या घरी गेल़े, तसेच धारदार कुकरी शस्त्राचा धाक दाखवून ‘कोण भाई झाले आहेत, ते मला बघायचे आहे’ अशी धमकी दिल़ी तसेच निखिल याचा चुलत मामे भाऊ याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, असे निखिल याने तक्रारीमध्ये म्हटले आह़े.
या वादानंतर तक्रारदार व त्यांच्यासोबत गावातील इतर प्रतिष्ठीत व्यक्ती या चिराग खटकूळ याच्या घरी गेल्य़ा. यावेळी चिरागने तक्रारदार यांना मारहाण केली, अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली आह़े.
त्यानुसार पोलिसांनी बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे, मारहाण व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1), 135 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 115, 352, 351 (2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केल़ा.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













