रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथून शहर पोलिस आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत सलमा राहील बोंबल (30) या बांगला देशी महिलेला ताब्यात घेतले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पासपोर्ट तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही महिला भारतात राहात असल्याचे एटीएसच्या निदर्शानास आल्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला आहे.
दरम्यान, मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षव विनय नरवणे, पोलिस अंमलदार स्वप्नील तळेकर तसेच रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार शरद जाधव, कौस्तुभ जाधव व महिला पोलिस अपर्णा सुर्वे मिळून संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















