रत्नागिरी : अवकाळी पावसाने जिल्ह्यात ३१.८९ लाखांचे नुकसान; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

banner 468x60

मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांचे ३१ लाख ८९ हजार ५४४ रुपयांचे नुकसान केले आहे. या कालावधीत वीज पडून एक व्यक्ती मृत्यू पावली तर सहा जखमी झाले आहेत.

banner 728x90

तसेच रत्नागिरी तालुक्यात भिंत पडून आणि गुहागर तालुक्यात झाड पडून ३ जण जखमी झाले. यंदा मे महिन्यातच ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह पडलेल्या या पावसाने जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे.

तसेच शेतमळ्यांमध्ये पाणी भरल्याने आता पेरणी कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यापासून पावसाने जिल्हाभर जोरदार हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरूवातीपासून सलग सुरू झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात ८ पक्क्या घरांचे पूर्णत: १,०९,८५० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. ५२ पक्क्या घरांचे २४ लाख ९९ हजार ३९४ रुपयांचे नुकसान केले आहे.

या पावसाने गोठ्यांचेही नुकसान केले आहे. जिल्ह्यात ४ गोठ्यांचे अंशत: २ लाख ७ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर २ गोठ्यांचे पूर्णत: ३,७३,५० रुपयांचे नुकसान केले आहे. लांजा येथे वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

तर ६ जण जखमी झाले. तसेच रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथे संरक्षक भिंत पडून ३ जण जखमी झाले. तर गुहागर तालुक्यातील आबलोली येथे झाड पडून ३ जण जखमी झाले आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *