रत्नागिरी : सलग दुसर्‍या दिवशी आणखी एका एलईडी बोटीवर कारवाई

banner 468x60

रत्नागिरी कस्टम विभागाने सलग दुसर्‍या दिवशी मासेमारीसाठी एलईडी लाईट पुरवणार्‍या आणखी एका बोटला पकडण्यात यश आले आहे.

त्यामुळे एलईडीसह लाखो रुपयाचे किमती सामान जप्त करण्यात आले आहे. यात जनरेटरसह तीन डझन एलईडी दिले व साहित्याचा समावेश आहे. मिर्‍या येथील समुद्रात ही कारवाई करण्यात आली.


रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथील सुगंधा टाकळे यांनी आपली गुरुप्रसाद ही बोट मनोज साळवी यांना भाड्याने दिली होती. मच्छीमारीसाठी घेण्यात आलेल्या या बोटीचा वापर मासेमारीदरम्यान एलईडी लाईट दाखवण्यासाठी केला जात होता.

या बोटीवर जनरेटर सह आठशे ते हजार वॅटचे जवळपास तीन डझन एलईडी सापडले आहेत.
कस्टम विभागाचे निरीक्षक भास्कर गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी सहा. आयुक्त संदीप चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. कस्टमच्या या कारवाईचा धसका मच्छीमारांनी घेतला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *