रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा झोपडपट्टी भागात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव इरफान दौला मकाशी (वय ३२, रा. मुरुगवाडा-झोपडपट्टी, रत्नागिरी) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी इरफान मकाशी याने घरात कुणी नसताना अज्ञात कारणातून छताच्या पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















