राजापूर तालुक्यातील एका तरुणीला नाहक त्रास देऊन धमकावल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील वाकेड येथील प्रशांत महादेव भितळे या इसमाविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात ती तर तिची आई बसने पंढरपूर येथे प्रवास करत होत्या. याच बसमध्ये प्रशांत भितळे हा इसमही प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान बसमधील प्रवाशांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता.
या ग्रुपमधून पीडित तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळवून प्रशांत भितळे याने तिला वारंवार फोन करून, “तू माझ्याशी लग्न करशील का?” असा प्रश्न विचारला. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिला. या नकाराचा राग मनात धरून आरोपीने तरुणी ज्या ठिकाणी राहत होती तेथे जाऊन तिला “तुला ठार मारेन” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तसेच आरोपीने तिचा मोबाईल फोन फोडून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी राजापूर पोलिसांनी प्रशांत महादेव भितळे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
तसेच आरोपीने तिचा मोबाईल फोन फोडून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी राजापूर पोलिसांनी प्रशांत महादेव भितळे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















