दापोली आगाराच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना मंडणगडमध्ये फटका

banner 468x60

मंडणगड / दापोली :- दापोली आगाराचा गलथान कारभाराचा प्रवाशी नागरीकांना वेळोवेळी फटका बसतो 11 जानेवारी 2025 रोजी दापोली आगारातून सकाळी 10.00 वाजता

banner 728x90

बोरवली मार्गावर मार्गस्थ झालेल्या गाडीचे इंधऩ चक्क मंडणगडमध्ये येऊन संपल्याने या गाडीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मंडणगडमध्ये रखडावे लागले.

भिंगळोली येथील आगाराचे बाहेर दीर्घकाळ उभ्या असलेल्या नागरीकांशी स्थानीक पत्रकारांनी आपण इतका वेळ महामार्गालगत का उभे आहात याची विचारणा केली असताना अडचणीत सापडलेल्या नागरीकांकडून ही धक्कादायक माहीती पुढे आली आहे.

या विषयासंदर्भात घटनास्थळी उभ्या असलेल्या दापोली आगाराच्या परळ मार्गावर मार्गस्थ होणाऱ्या अन्य एका गाडीच्या वाहकाने दिलेल्या माहीतीनुसार बोरवली मार्गवार सकाळी मार्गस्थ झालेल्या गाडीचे इंधन मंडणगडमध्ये येऊन संपले

मंडणगड आगारातून पंपाचे तांत्रीक अडचणीमुळे या गाडीस इंधन मिळालेले नाही मागावून आलेल्या गाडीने नागरीकांची समस्या संपवली असून गाडी आता बोरीवली मार्गावर मार्गस्थ होणार असल्याचे कळले

दरम्यान अडचणी आलेल्या अनेक प्रवाशांना दापोली आगारात लांब पल्यावर मार्गस्थ होणाऱ्या गाड्यांचे इंधन व अन्य गोष्टी का तपासल्या जात नाही असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *