अपघातात चिपळुणातील 31 जण जखमी, दोन गंभीर, एकाला कोल्हापूरला हलवले
रविवारी सकाळी 8 वाजता निवळी येथे झालेल्या बस आणि टँकर अपघातात अद्यापही वाहतूक ठप्प आहे. टँकर मधून गॅस लिकेज होत असल्यामुळे ही वाहतूक थांबवण्यात आली आहे. जवळपास 10 तासांचा कालावधी लोटला तरी वाहतुक ठप्पच आहे. महामार्ग पोलिसांनी वाहतूक उक्षी मार्गे वळवली आहे. त्यामुळे उक्षी घाटात ही वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांची दमछाक झाली आहे.
गंभीर जखमींमध्ये मंदा खाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर मीना विनायक शिरकर यांच्या चेहऱ्याला आणि उजवा हात फ्रॅक्चर आहे. त्यांनी परकार हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
10 तास वाहतूक ठप्प असल्यामुळे वाहन चालकासह प्रवाशी हैराण झाले आहेत. महामार्गावर प्रथमच एवढ्या मोठया वेळेसाठी वाहतूक ठप्प झाली आहे. 12 वर्षापूर्वी निवळी याच घाटात एस. टी चा मोठा अपघात झाला होता. त्यावेळी 6 तास वाहतूक ठप्प होती. त्यानंतर आता 10 तास वाहतूक बंद आहे. अपघाताची भीषणता गंभीर आहे. सकाळपासून वाहतूक ठप्प झालेली असल्यामुळे 6-7 किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्ग वाहतूक पोलिसाची यामध्ये दमछाक झाली असून अखेर ल ही वाहतूक उक्षि मार्गे वळवण्याचा निर्णय घेतला. मात्र उक्षी घाट वळणाचा असल्यामुळे वाहने मोठया प्रमाणात या मार्गावरून जात असल्यामुळे येथेही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उद्या सोमवारी कामावर जाण्यासाठी वाहन धारकांची चढाओढ दिसत आहे.
आजच्या अपघातातील टँकर मधून गॅस मोठया प्रमाणात लिकेज झाला आहे. या गॅसने पेट घेतला आहे. मात्र उर्वरित गॅस दुसऱ्या टँकर मध्ये भरण्यात येत आहे. मात्र कोणताही अनर्थ होऊ म्हणून ही वाहतूक थोपवून ठेवण्यात आली आहे. मात्र वाहन चालक प्रवासी हैराण झाले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













