रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला असून भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केलीय. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे असणार आहेत.
या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सावंत हे इच्छुक होते. मात्र शेवटी भाजपचे नारायण राणे हे उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांचा अर्ज भरताना आम्ही
त्यांच्यासोबत राहू असं स्पष्ट करत कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तेथून निवडणूक लढवायची होती, असा शिवसेनेचा दावा मागे घेण्यात आला.
आता त्यांनी नाव मागे घेतले असून भाजपचे उमेदवार नारायण राणे असणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*