मुंबई : वैभव खेडेकरांनी घेतली प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण यांची भेट, पॉलिटिकल करिअरसाठी खेडेकरांची धडपड

banner 468x60

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश तिसऱ्यांदा रखडला असून त्यांनी पुन्हा भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतली आहे.
या भेटींनंतरही त्यांच्या प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.


‘राज’ ठाकरे यांच्या कृपेचा हात सुटल्यानंतर खेडेकर यांची राजकीय परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे बोलले जात आहे.
मनसेतून बडतर्फ झाल्यानंतर भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले कोकणातील नेते वैभव खेडेकर यांनी भाजपचे महत्वाचे नेते प्रवीण दरेकर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खेडेकर यांचा पक्षप्रवेश काही कारणांमुळे लांबणीवर पडला होता, मात्र या भेटीमुळे आता हा रखडलेला प्रवेश मार्गी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव खेडेकर यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. दरेकर यांची ‘स्वयंपूर्ण विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी’ नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट नव्हती. तर या भेटीत खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. खेडेकर यांचा प्रवेश लवकरच व्हावा यासाठी दरेकर यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे बोलले जाते.


प्रवीण दरेकर यांच्या भेटीनंतर वैभव खेडेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही भेट घेतली. कोकणातील राजकारणावर आणि आगामी वाटचालीसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. यापूर्वीच भाजपच्या काही नेत्यांनी खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली होती, मात्र काही अंतर्गत कारणांमुळे तसेच राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्द्यामुळे हा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. प्रदेशाध्यक्षांशी झालेल्या भेटीमुळे आता प्रवेशाचा निश्चित मुहूर्त लवकरच ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मनसेमधून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात होता. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तयारी देखील केली होती, मात्र प्रवेश लांबल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. आत दरेकर आणि चव्हाण या दोन्ही बड्या नेत्यांशी झालेल्या चर्चेमुळे या महिन्यातच त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी खेडेकर यांच्यासोबत वसंत पिंपळकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *