शृंगारतळी : पैसे पाठविण्याच्या बहाण्याने मनी ट्रान्सफर दुकान मालक आजीम साल्हेंना 25 हजार रुपयांना फसवले

banner 468x60

गुहागर शृंगारतळी येथील मनी ट्रान्सफर दुकानात फसवणुकीची घटना घडली आहे. दिनांक 19/11/2024 रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आजीम दाऊद साल्हे यांच्या मालकीच्या शृंगारतळी येथील स्टार इलेक्ट्रिकल मनी ट्रान्सफर या दुकानात फिर्यादी हे उपस्थित असताना

इसम गणेश उगलमुगले हा फसवणूक करण्याच्या इराद्याने फिर्यादीच्या दुकानामध्ये येऊन त्याने फिर्यादीस इंडियन ओव्हरसीज बँक खाते क्रमांकावर २५ हजार रुपये ट्रान्सफर करायला लावून सदरची रक्कम फिर्यादी यांनी गणेश उगलमुगले याने सांगितलेल्या खाते क्रमांकावर ट्रान्सफर केली असता त्याचे २५ हजार रुपये रोख रक्कम ही गणेश उगलमुगले याने फिर्यादीस न देता तो ऑफिस मधून पळून जाऊन फिर्यादीची फसवणूक केली असल्याची घटना घडली आहे.

शृंगारतळी येथे आजिम दाऊद साल्हे (वय 35) स्टार इलेक्ट्रीकल मनी ट्रान्सफर नावाचे दुकान आहे. दुकानात साल्हे मोबाईल तसेच इलेक्ट्रीकल्स वस्तुंची विक्री व दुरुस्ती करतात. सन 2014 पासून याच दुकानात त्यांनी अधिकृत बँकिंग पॉईन्ट सुरु केले आहे. या बँकिंग पाँईंन्टद्वारे ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात जमा करुन देण्याची सेवा दिली जाते.

त्यांच्या दुकानात आलेल्या ग्राहकाने त्यांना 25 हजार रुपयांना फसविले. याबाबत पोलीस ठाण्यात त्यांनी 24 नोव्हेबर रोजी तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे 19 नोव्हेंबर रोजी रात्री 8.45 च्या सुमारास दुचाकीवरुन गणेश उगलमुगले दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडील रोख रु. 25 हजार ओव्हरसीज बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.

गणेश उगलमुगले यांनी सांगितलेल्या ओव्हरसीज बँकेत माझ्या कॅनरा बँकेच्या खात्यातून सुरवातील 1 रु आणि नंतर 24 हजार 999 रु. ट्रान्सफर केले. आता गणेश उगलमुगले यांच्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दुचाकीला लावलेल्या पिशवीतील पैसे आणून देतो असे सांगुन गणेश दुचाकीजवळ गेला.

त्यानंतर दोन मिनिटे दुचाकीला लावलेली पिशवी चाचपडून त्यातील पैसे शोधु लागला. त्याचवेळी दुचाकी सुरु करुन गुहागरच्या दिशेने गणेशने पलायन केले. हे लक्षात आल्यावर मी तातडीने दुकान बंद करुन त्याचा पाठलाग केला. मात्र तो मला सापडला नाही, अशी तक्रार त्यांनी दाखल केली आहे.

यासंदर्भात गुहागर पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९४/२०२४ मध्ये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून उपनिरीक्षक संदिप भोपाले अधिक तपास करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *