दापोली : मतदारसंघातील मतमोजणी 28 फेरीत होणार

banner 468x60

दापोली विधानसभा मतदारसंघातील मतदान पेट्या सर विश्वेश्वरेय्या सभागृहातील स्ट्राँगरूममध्ये सील करण्यात आल्या असून येथे 66.84 टक्के मतदान झाले आहे.

शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात होईल व साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत मतमोजणी संपून निकाल अपेक्षित आहे. मतमोजणी काळात दापोली तहसील कार्यालय ते बुरोंडी नाका हा मार्ग सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. थोरबोले यांनी दिली.


उद्या कोकण कृषी विद्यापीठाच्या विश्वेश्वरेय्या सभागृह येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यावेळी महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांचे समर्थक व महायुतीचे उमेदवार संजय कदम, मनसे, बसपा तसेच अपक्ष उमेदवारांचे समर्थक मतमोजणीचे निकाल ऐकण्यासाठी उपस्थित राहाणार आहेत.

या मतदारसंघात एकूण 392 मतदान केंद्रांवर मतदान झाले. विश्वेश्वरेय्या सभागृहात सकाळी 8 वाजता 06 टेबलवर पोस्टल मतदानाची मोजणी सुरु होईल. त्यानंतर 14 टेबलवर इव्हिएम मशिनची क्रमवार मोजणी सुरु होईल. एकूण 28 फेऱ्यांमध्ये ही मोजणी होणार आहे.

दुपारी 2 वाजेपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे, असेही डॉ. थोरबोले यांनी सांगितले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *