मंडणगड : अनोळखी मृतदेह आढळला, पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात बाणकोट ते वेळास जाणाऱ्या समुद्रालगतच्या सार्वजनिक रस्त्यावर मंगळवार, दि. २४ जुलै २०२४ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एका अंदाजे ५५ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृत व्यक्तीचे नाव, गाव तसेच नातेवाईकांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.


मृत व्यक्तीच्या अंगात केसरी रंगाचा हाफ टी-शर्ट असून केस काळे-पांढरे वाढलेले आहेत. अंगावर कोणतीही मौल्यवान वस्तू आढळून आलेली नाही. मात्र, मृत व्यक्तीच्या डाव्या दंडावर निळ्या रंगाची कापडी पट्टी बांधलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले.


या अनोळखी मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, बाणकोट सागरी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *