आगामी निवडणुकीसाठी दापोली तालुक्यात सध्या कार्यकर्त्यांची आऊटगोईंग-इनकमिंग सुरु आहे. मंडणगड तालुक्यातील गोठे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि उबाठा गटाचे देव्हारे गण विभाग प्रमुख संजय बोथरे यांनी गावातील कार्यकर्त्यांसह आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत कांदिवली येथील पालखी निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

दापोली मतदारसंघातील आमदार योगेश कदम यांच्या कामावर प्रभावित होऊन आणि विकासक वाटचालीवर विश्वास ठेऊन शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, माजी उप तालुकाप्रमुख संजिवजी येसावरे आणि युवासेना


तालुका अधिकारी निलेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नाने , गोठे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय बोथरे यांनी प्रवेश केला आहे. आमदार योगेश कदम यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी याप्रसंगी माजी सभापती भगवान घाडगे, दापोली विधानसभा संपर्कप्रमुख. सुधीर भाऊ कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख आदेश केणे, तालुका संघटकअनंत लाखण, मुंबई संपर्कप्रमुख . शंकर बांद्रे, मुंबई तालुका संघटक तुकाराम गायकवाड, शहरप्रमुख तथा गटनेता विनोद जाधव, मुंबई विभाग संघटक शिरगांव गण दिनेश काप, मुंबई सल्लागार सुरेश काप,
सचिव सिध्देश देशपांडे, सुभाषजी भागडे, युवासेना जिल्हा सचिव विनयजी काते, युवासेना मुंबई तालुका संघटक प्रमोदजी दुर्गवळे, उपतालुका अधिकारी दिपेशजी शेलार, विभाग संघटक .
रुपेश दुर्गवळे, युवासेना सहसचिव मुंबई सतिषजी सोंडकर तसेच दापोली तालुक्यातील शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













