मंडणगड : 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील पालवणी चेकपोस्ट परिसरात एका १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. ऐश्वर्या किसन पवार (वय १८, मूळ रा. यड्रामी, जि. कलबुर्गी, कर्नाटक; सध्या रा. पालवणी फाटा, मंडणगड) असे मृत तरुणीचे नाव आहे. ऐश्वर्या ही सकाळी सुमारे

banner 728x90 banner 728x90

१०:३० वाजता आपल्या राहत्या घरातून बाहेर पडली होती. मात्र सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास पालवणी चेकपोस्ट येथील बैठकीच्या हॉलजवळ असलेल्या काजूच्या झाडाच्या फांदीला ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळून आले.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (बी.एन.एस.एस. १९४) करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ऐश्वर्याच्या निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *