दारूच्या नशेत तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दहागाव (ता. मंडणगड) येथील दळवीवाडी परिसरात घडली. श्रीरंग हैबर जगताप (रा. दहागाव, दळवीवाडी) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरंग जगताप यांना दारूचे व्यसन होते. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घराबाहेर पडलेल्या जगताप यांचा शोध लागत नव्हता. अखेर १३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता गावातील अनिल जनार्दन जगताप यांच्या घरामागील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
विहिरीच्या कडेला बसले असताना तोल जाऊन ते पाण्यात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद आमू. क्र. १०/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास मंडणगड पोलिस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















