मंडणगड : वेळेत उपचार न मिळाल्याने आईसह बाळाचा मृत्यू, 108, 102 रुग्णवाहिका कॉल करुन उपलब्ध नाही, राज्यमंत्री योगेश कदम घटनेची दखल घेणार का?

Screenshot

banner 468x60

कोकणात आरोग्याचा बोजवारा पुन्हा एकदा उडाल्याचं पाहायला मिळाला आहे. ग्रामीण भागात अश्या घटना नवीन नाही मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने आईसह बाळाचा मृत्यू झाला असून 108, 102 रुग्णवाहिका कॉल करुन उपलब्ध झाल्या नाही. मंडणगड सारख्या तालुका ठिकाणी महिलांना दापोलीत यावं लागत आहे.

विधी संदेश सावणेकर (वय 32)

banner 728x90

सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध असूनही यावेळी आरोग्य व्यवस्थापनाकडून रुग्णवाहिका का उपलब्ध करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आज एका आईचा आणि बाळाचा जीव गेला आहे.


मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक गावातील
एका गर्भवती महिलेचा उपचारासाठी जात असताना प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 10 मे 2025 रोजी घडली आहे. या घटनेनंतर तालुक्यातील आरोग्य विभाग व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.


यासंदर्भात महिलेच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तालुक्यातील कुडूक बुद्रुक या गावातील विधी संदेश सावणेकर (वय 32) या सात ते आठ महिन्यांच्या गरोदर होत्या.

त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, देव्हारे येथे उपचारासाठी आणले, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे पाठवले. ग्रामीण रुग्णालयात या महिलेची प्रकृती आणखीनच अत्यवस्थ बनली.


वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात त्या निघाल्या; मात्र ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. 108 ही रुग्णवाहिका कॉलसाठी अन्य ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. तर 102 ही रुग्णवाहिका रुग्णालयात असतानाही विविध कारणांनी उपलब्ध झाली नाही.

नाईलाजाने या महिलेच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णवाहिकेचा आधार घेऊन उपजिल्हा रुग्णालय दापोली गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रवासादरम्यान या महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.
तालुक्यातील या घटनेनंतर, सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध असूनही यावेळी आरोग्य व्यवस्थापनाकडून रुग्णवाहिका का उपलब्ध करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अत्यावश्यक सुविधेकरिता रुग्णवाहिकेची सेवा आवश्यक असताना केवळ रुग्णवाहिकेमुळे या महिलेच्या पुढील उपचारासाठी विलंब झाला. कोकण कट्टा न्यूजने याबाबत वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथील वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र या बातमी सदर्भात कोकण कट्टा न्यूज पाठपुरावा करत राहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *