मंडणगड : सर्कल, तलाठी आणि लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडले, 45000 ची लाच घेताना पकडले

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडवून देणारी घटना मंडणगड येथे घडली आहे. एका कामासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी, सर्कल आणि लिपिक असे महसूल विभागाचे तीन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (ACB) जाळ्यात रंगेहात सापडले.

banner 728x90

एकाच वेळी तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागातील एका कामासाठी ४५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.

ही लाच घेताना मंगळवारी (आज) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालयाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडले.

यामध्ये सर्कल अमित शिगवण, तलाठी श्रीरामे आणि कोषागार कार्यालयातील शिपाई भोसले यांचा समावेश आहे. तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसांची कारवाई सुरू होती. या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *