लांजा तालुक्यातील भांबेड येथे लाकूड तोडण्याचे काम करत असताना झालेल्या अपघातात ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नामदेव आत्माराम दैत (वय ६५, रा. भांबेड दैतवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता मालक सुनील कानडे यांच्याकडे लाकूड तोडण्याचे काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तोडलेली लाकडे ट्रकमध्ये भरत असताना अचानक एक मोठा लाकडी ओंडका नामदेव दैत यांच्या डोक्यावर कोसळला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर मालक सुनील कानडे यांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना आयसीयू विभागात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असतानाच रात्री ७:४५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची अधिकृत नोंद ८ एप्रिल रोजी मध्यरात्री करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
या दुर्घटनेमुळे भांबेड परिसरात शोककळा पसरली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













