लांजा तालुक्यातील भडे तोरस्करवाडी येथून विवाहीत महिला बेपत्ता झाल्याची घटना ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून तिच्या वडिलांनी लांजा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी उर्फ योगिता जनार्दन फोडकर (वय २७, रा.तोरस्करवाडी,भडे. ता.लांजा, जि. रत्नागिरी) हीने आपल्या वडिलांना मी मुंबई येथे कामाला जाते असे सांगितले.
त्यावर तिच्या वडिलांनी एकटी जाऊ नकोस मी सोडायला येतो असे सांगितले. परंतु गौरी उर्फ योगिता हिने मी एकटी जाते असे सांगून ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्या मोबाईल नंबरवर संपर्क केला असता तिचा फोन बंद लागला. म्हणून तिच्या वडिलांनी आजूबाजूला तसेच सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली असता तिचा शोध लागला नाही.
अखेरीस गौरी उर्फ योगिता हिचे वडील रामचंद्र विठ्ठल तांबे (वय ५९, रा.भडे, तोरस्करवाडी, ता.लांजा, जि. रत्नागिरी) यांनी ७ जुलै रोजी लांजा पोलीस ठाणे येथे मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.
बेपत्ता झालेली गौरी उर्फ योगिता जनार्दन फोडकर हिचे वर्णन रंग निमगोरा, अंगाने सडपातळ, उंची ५ फुट २ इंच, केस मध्यम, चेहरा गोल, कानात झुमके, हातात एक हिरवी बांगडी, अंगात पिंक कलरचा पंजाबी ड्रेस, पांढऱ्या व लाल रंगाची ओढणी, पायात पांढऱ्या रंगाची सँडल असे आहे.
दरम्यान, वरील वर्णनाची व्यक्ती कोठे आढळून आल्यास लांजा पोलीस ठाणेत संपर्क करावा असे आवाहन लांजा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर करत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*