मंडणगड : दारूच्या नशेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या वृद्धाचा मृत्यू

banner 468x60

दारूच्या नशेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सीताराम सुडकोजी शिंदे (वय ६६, रा. आलेगाव, पो. देवारी, ता. मंडणगड) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

ही घटना बुधवारी (ता. १८) पहाटे चारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. मंगळवारी (ता. १७) चारच्या सुमारास घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते.

अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत याबाबत नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *