संगमेश्वर : आयुष्याला कंटाळून कब्बडी पटूने विष पिऊन आत्महत्या केली

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावातील एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रोमित लोध (३०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रोमित यांनी बुधवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्रीच हलविण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात आज बारा वाजण्याच्या सुमारास रोमित यांची प्राणज्योत मालवली. रोमित हे कबड्डीपटू होते. त्यांच्या पश्चात एक मोठा भाऊ आहे. याप्रकरणी रत्नागिरी येथील शहर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *