रत्नागिरी : बांधकाम सुरु असलेल्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेत तरुणाची आत्महत्या

banner 468x60

तालुक्यातील वाटद खंडाळा येथे बांधकाम सुरु असलेल्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

ही घटना बुधवार 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.15 वा.घडली. राकेश वामन आलीम (20,रा.सांडेलागवण खालचीवाडी,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत विरेंद्र विलास बेंद्रे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, वाटद खंडाळा येथे त्यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे.

बुधवारी सकाळी ते त्याठिकाणी गेले असता त्यांना घराच्या बेडरुममधील लोखंडी बारला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

त्याच्या नातेवाईकांनी राकेशच्या गळ्याला बांधलेली दोरी कोयतीने कापून त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी राकेशला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *