राजापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत लांजात दोन्ही जागांवर शिंदे गटाचा विजय

banner 468x60

इसवली पनोरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना (शिंदे) गटाने दोन्ही जागांवर विजय संपादन केला असून शिवसेना (ठाकरे) गटाला जोरदार धक्का देत आपले खाते उघडले आहे.

या निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत, अण्णा सामंत आणि किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली अबार बरमारे यांनी ही निवडणूक यशस्वीपणे हाताळून हा विजय संपादन केला.

banner 728x90 banner 728x90

यासाठी दीपक कदम, रोहिदास मेस्त्री, उदय मेस्त्री, रवींद्र मेस्त्री, राजाराम मेस्त्री, मंगेश कवचे तसेच सर्व सुतारवाडी ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली. या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर विजय संपादन केल्यानंतर लांजा शहरातील शिवसेना (शिंदे) गटाच्या कार्यालयासमोर फटाके वाजवून आणि घोषणाबाजी करून जोरदार जल्लोष करण्यात आला.

यावेळी लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, शहरप्रमुख सचिन डोंगरकर, प्रसाद भाईशेट्ये तसेच संजय तेंडुलकर, युवासेना तालुका अधिकारी राजू धावणे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. साटवलीतील जागा बिनविरोधतालुक्यातील इसवली पनोरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील दोन जागांसाठी रविवारी ५ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक झाली होती.

सोमवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात या दोन्ही जागांवर शिवसेना (शिंदे) गटाने विजय संपादन केलंय. या पोटनिवडणूकीत शिवसेना (शिंदे) गटाच्या अदिती अमोल मेस्त्री (१८९ मते) आणि मधुरा मंगेश मेस्त्री (१९० मते ) घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना (ठाकरे) गटाच्या समीधा संतोष आग्रे आणि सलोनी संतोष कवचे यांचा पराभव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *